HDFC बँकेच्या भरुचा यांचा राजीनामा 
राष्ट्रीय

HDFC बँकेच्या भरुचा यांचा राजीनामा

देशातील सर्वात मोठीखासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : देशातील सर्वात मोठीखासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने शनिवारी ही माहिती दिली. भरुचा हे १ ९९५ पासून बँकेत कार्यरत आहेत. त्यांनी येत्या ३१ डिसेंबरपासून सेवेतून मुक्त करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती बँकेने शेअर बाजारांना दिलेल्या निवेदनात नमूद केली.

भरुचा यांची विनंती स्वीकारून ती मंजुरीसाठी आरबीआयकडे पाठवण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे, असेही बँकेने स्पष्ट केले.

प्रतिस्पर्धी आयसीआयसीआय समूहातील अनूप बागची हे २७ ऑक्टोबर रोजी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी व सीईओ) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्याच्या काही दिवस आधीच भरुचा यांनी राजीनामा दिला आहे. एचडीएफसी बँकेच्या एमडी व सीईओ पदासाठीच्या शर्यतीत भरुचा यांचेही नाव असल्याचे वृत्त होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड