उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाऊस; वादळाचा कहर 
राष्ट्रीय

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाऊस; वादळाचा कहर

बिहारमध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पाटणा, खगडिया, रोहतास, औरंगाबाद, कैमूर आणि छपरा यासह २० जिल्ह्यांमध्ये भरदिवसा सर्वत्र अंधार पसरला आणि नंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.

Swapnil S

पाटणा/लखनऊ : बिहारमध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पाटणा, खगडिया, रोहतास, औरंगाबाद, कैमूर आणि छपरा यासह २० जिल्ह्यांमध्ये भरदिवसा सर्वत्र अंधार पसरला आणि नंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.

राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. अंधार पसरल्याने अनेक लोक वाहनांचे दिवे लावून प्रवास करताना दिसले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये पुढील तीन दिवस हवामान असेच राहील. तर शेजारी उत्तर प्रदेशात ताशी १०० किमी वाहणाऱ्या वादळीवाऱ्यांनी कहर केला असून, एक निर्माणाधीन पूल कोसळून त्याखाली ६ जण चिरडले गेले आहेत.

Maharashtra Legislative Council Elections 2026: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

साबण, शाम्पू आणि टूथपेस्टवर आता 'शाकाहारी', 'मांसाहारी' चिन्ह अनिवार्य; केंद्र सरकारचा नवा नियम

Mumbai : 'गॅलॉप्स' सह ५ रेस्टॉरंट्सचे परवाने केले निलंबित

फाळके पुरस्काराने अनंत नाग सन्मानित; कार्तिक आर्यन, ममूटी सर्वोत्कृष्ट अभिनेते, यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण