ई२० पेट्रोलमुळे झाले नुकसान; मारुतीला भरपाई देण्याचे आदेश, पहिला आदेश ठरला ऐतिहासिक 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

ई२० पेट्रोलमुळे झाले नुकसान; मारुतीला भरपाई देण्याचे आदेश, पहिला आदेश ठरला ऐतिहासिक

रायपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने अशा वाहन मालकाच्या बाजूने निर्णय दिला आहे ज्याने असा आरोप केला होता की, इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे त्याच्या वाहनाचे नुकसान झाले.

Swapnil S

रायपूर : रायपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने अशा वाहन मालकाच्या बाजूने निर्णय दिला आहे ज्याने असा आरोप केला होता की, इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे त्याच्या वाहनाचे नुकसान झाले.

केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाशी संबंधित ग्राहक न्यायालयाचा हा भारतातील पहिला ज्ञात आदेश आहे. आयोगाने आदेशात मारुती सुझुकी व डीलरला वाहन मालकाचा दुरुस्तीचा खर्च परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारदाराचा दावा होता की, जानेवारी २०२३ मध्ये तयार ‘मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्ट्राँग हायब्रिड झेटा प्लस’ या वाहनात ई२० पेट्रोल भरल्यानंतर इंजिनच्या समस्या वारंवार उद्भवू लागल्या.

मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की, इंधनात भेसळ असल्याचे कारण देत एका ग्राहकाचे वाहन बदलून त्याऐवजी नवीन 'ई२०' सुसंगत वाहन देण्याचे निर्देश देणाऱ्या रायपूर येथील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या आदेशाला कंपनी आव्हान देणार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल