राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार! CBI करणार सरकारी बंगल्याच्या बांधकामाची चौकशी

या सर्व प्रकरणात सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्लीच्या नायब राज्यपालांनी मुख्य सचिवांना दिल्या होत्या.

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री अरवंद केजरीवाली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या बांधकामात कथित घोटाळ्याच्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मद्य परवाना घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये आहेत. आता सीबीआयने थेट मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी सरसावली आहे. या संबंधित गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणात सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्लीच्या नायब राज्यपालांनी मुख्य सचिवांना दिल्या होत्या. तसंच या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. केंद्राने देखील या प्रकरणाची नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगकडून चौकशी करण्याची शिफारस केली होती. राजभववाकडून या तपासाचे आदेश दिल्याचं देखील सांगितलं जात आहे. राजभवनाच्या वतिने २४ मे रोजी गृह मंत्रालयाचे पत्र आल्यानंतर विशेष कॅग ऑडिटची शिफारस करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

नायब राज्यपाल यांच्या कार्यालयातून याबाबतचं पत्र प्राप्त झालं आहे. या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणात आर्थिक अनियमितता आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता. या सीबीआय चौकशीमुळे अरविंद केरजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

मारू नये सर्प संताचिया दृष्टी

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश