(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

कुत्र्याच्या चावण्याचा अंदाज कसा लावणार? सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल

भटका कुत्रा कधी चावण्याच्या मनस्थितीत असेल आणि कधी नाही, याचा अंदाज लावणे शक्य नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवरून भटके कुत्रे हटवायला हवेत, असे स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : भटकी कुत्री केवळ चावतात असे नाही, तर ते गंभीर अपघातांनाही कारणीभूत ठरतात, रस्‍ते भटक्‍या कुत्र्यांपासून मुक्त आणि मोकळे ठेवावे लागतील. अशी महत्त्‍वपूर्ण टिप्‍पणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने बुधवारी केली. भटका कुत्रा कधी चावण्याच्या मनस्थितीत असेल आणि कधी नाही, याचा अंदाज लावणे शक्य नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवरून भटके कुत्रे हटवायला हवेत, असे स्पष्ट केले.

तसेच शाळा, हॉस्पिटल किंवा न्यायालयात भटके कुत्रे का आहेत, अशा संवेदनशील परिसरातून त्यांना बाहेर काढण्यासाठी काय आक्षेप आहे, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने विचारला. न्या. विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. एन. व्ही. अंजारिया या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

कुत्र्याचे समुपदेशन

प्राणिमित्रांच्या याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, जो कुत्रा चावण्याची शक्यता आहे किंवा तो भुंकणारा असेल तर स्थानिकांनी त्या कुत्र्यासंदर्भात संबंधित केंद्राला माहिती द्यावी. केंद्राचे कर्मचारी सदर कुत्र्याला घेऊन जातील त्याचे लसीकरण व इतर उपचार करून त्याला पुन्हा त्याच परिसरात सोडतील. या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने मिश्किल प्रतिक्रिया दिली. खंडपीठाने वकिलांना म्हटले की, ‘बाहेर सोडल्यावर कुणाला चावू नकोस’ असे त्या कुत्र्याचे समुपदेशन करण्याचा मुद्दा तुम्ही विसरलात.

अपघातही होतात

खंडपीठाने पुढे म्हटले की, कुत्रा फक्त चावतो किंवा रस्त्यावर एखाद्याचा पाठलाग करतो, एवढाच विषय नाही. तर यामुळे अपघातही होऊ शकतो. ज्या रस्त्यावर वाहने धावत असतात तिथून भटके कुत्रे पळत असतात. ही एक मोठी अडचण आहे. हा फक्त चावण्याशी संबंधित विषय नाही. यावर सिब्बल म्हणाले की, पण भटके कुत्रे रस्त्यावर नाहीत तर कम्पाऊंडमध्ये आहेत. यावर खंडपीठाने त्यांना म्हटले की, तुमची माहिती फारच जुनी आहे.

Kerala : अखेर मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला; व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब, काँग्रेसचा मोठा निर्णय

दागिने महागणार, तस्करी वाढण्याची भीती; सोन्यावरील आयात शुल्कात १५ टक्के वाढीचे परिणाम

... तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता! RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर होणार कारवाई; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना