नातू आणि आजोबा (डावीकडून)  सौजन्य : एक्स @TheWarArchive
राष्ट्रीय

"चाकूने ७३ वेळेस भोसकले"; अमेरिकेतून परतलेल्या नातवाने उद्योगपती आजोबांची संपत्तीच्या वादातून केली निर्घृण हत्या

भांडणामध्ये पडलेल्या स्वतःच्या आईवरही त्याने वार केले.

Swapnil S

हैदराबाद : हैदराबादमधील प्रख्यात वेलजन उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. जनार्दन राव यांची नातवाने ७३ वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. राव यांच्या नातवाचे नाव के. कीर्ती तेजा असे असून त्याला अटक करण्यात आली आहे.

व्ही. सी. जनार्दन राव (वय ८६) यांच्यावर कीर्ती तेजा (२८) याने गुरुवारी चाकूने ७३ वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी या भांडणामध्ये पडलेल्या स्वतःच्या आईवरही त्याने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी कीर्ती तेजा हा उच्चशिक्षित आहे. त्याने अमेरिकेत मास्टर्स डिग्री मिळवली आहे. अलीकडेच तो हैदराबादला परत आला आहे. तो हैदराबादच्या पश्चिम कॉरिडॉरमधील लॅन्को हिल्समध्ये राहत होता. राव यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. हत्येच्या दिवशी तो सायंकाळी आईसोबत आजोबांच्या घरी गेला होता. त्यानंतर संपत्तीवरुन त्याचा आजोबांसोबत वाद झाला आणि त्याने आजोबांवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.

त्याला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वेलजन उद्योग समूहाची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली आहे. जहाज बांधणी, ऊर्जा, मोबाइल आणि औद्योगिक क्षेत्रात हा समूह कार्यरत असल्याचे या समूहाच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Nashik : महिंद्राच्या ५,००० कोटींच्या EV प्रकल्पाला भूसंपादनाचा अडथळा; मुख्यमंत्र्यांकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

Pune : सुधारित ‘उडान’ योजनेत महाराष्ट्राला संधी; सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे हवाई मार्गांची निवड

Mira-Bhayandar : गरब्यातील वादाचे पडसाद पोलीस ठाण्यात; आवारातच हाणामारी

Jalgaon : खान्देशातील बोलीभाषांच्या जतनासाठी विद्यापीठात केंद्र; शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार, उदय सामंत यांची घोषणा