दिल्ली,मुंबईसह अनेक विमानतळांवरील GPS सिग्नलच्या डेटामध्ये छेडछाड; केंद्र सरकारची संसदेत माहिती 
राष्ट्रीय

दिल्ली, मुंबईसह अनेक विमानतळांवरील GPS सिग्नलच्या डेटामध्ये छेडछाड; केंद्र सरकारची संसदेत धक्कादायक माहिती

दिल्ली विमानतळासह आणखी काही प्रमुख विमानतळावरील विमानांच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेत दिली.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळासह आणखी काही प्रमुख विमानतळावरील विमानांच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेत दिली.

गेल्या काही महिन्यांत दिल्लीसह देशभरातील काही महत्वाच्या विमानतळावरील फ्लाइट्सच्या जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या घटना घडल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

संसदेच्या या अधिवेशनात एसआयआरसह वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता असतानाच पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने दिल्लीसह आदी महत्वाच्या विमानतळाच्या संदर्भातील महत्वाची माहिती सभागृहात दिली.

विमानतळांची नावे

नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हा खुलासा केला आहे. ही माहिती देताना नायडू यांनी या घडलेल्या घटनांची माहिती आणि त्यानंतर या समस्या दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही संसदेत दिली. यामध्ये दिल्ली, कोलकाता, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

खटला सुरू नसताना आरोपीला बेमुदत काळासाठा डांबता येणार नाही! सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

ISI साठी हेरगिरी केल्याबद्दल नौदलाच्या लान्स नायकला अटक

प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना 'QR कोड' अनिवार्य; टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारित वाहनांना भाडे स्वीकारावेच लागणार; ३ महिन्यांत निर्णय लागू