जूनमध्ये वनस्पती तेल आयात कमी; पाम तेलावरील सवलत कमी झाल्याने २९ टक्के घट (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

जूनमध्ये वनस्पती तेल आयात कमी; पाम तेलावरील सवलत कमी झाल्याने २९ टक्के घट

पाम तेलावर इतर तेलांच्या (सोयाबीन तेल) तुलनेत मिळणारी सवलत कमी झाल्यामुळे चालू तेल वर्षातील सर्वात नीचांकी पातळी नोंदवत जून महिन्यात भारताची वनस्पती तेल आयात वार्षिक तत्त्वावर २९ टक्क्यांनी घटून ११.४६ लाख टनांवर आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पाम तेलावर इतर तेलांच्या (सोयाबीन तेल) तुलनेत मिळणारी सवलत कमी झाल्यामुळे चालू तेल वर्षातील सर्वात नीचांकी पातळी नोंदवत जून महिन्यात भारताची वनस्पती तेल आयात वार्षिक तत्त्वावर २९ टक्क्यांनी घटून ११.४६ लाख टनांवर आली आहे. ‘सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने मंगळवारी ही माहिती दिली.

जून महिन्यातील आयातीमधील घसरणीला पाम आणि सोयाबीन तेलाच्या खरेदीतील कपात कारणीभूत ठरली.

पाम तेल : पाम तेलाच्या आयातीत मासिक तत्त्वावर १०.५ टक्क्यांची घट होऊन ती ४,८७,००० टनांवर आली. कच्च्या पाम तेलाची आयात मे महिन्यातील ५,४६,४५६ टनांवरून घसरून ४,८८,८६३ टन झाली.

सोयाबीन तेल : पाम तेलाचा इतर तेलांसोबतचा दरातील फरक प्रति टन ५० डॉलरपेक्षा कमी झाल्यामुळे सोयाबीन तेलाची आयात मे महिन्यातील ४,९४,००० टनांवरून २३ टक्क्यांनी घसरून जूनमध्ये ३,८१,००० टन झाली.

सूर्यफूल तेल : या ट्रेंडच्या विरुद्ध जात सूर्यफूल तेलाची आयात मे महिन्यातील १,९५,७२६ टनांवरून वाढून जूनमध्ये २,४२,८७० टन झाली.

रिफाइंड कुकिंग ऑईल : रिफाइंड खाद्यतेलाची आयात सलग दुसऱ्या महिन्यात शून्य राहिली.

चालू आर्थिक वर्षातील एकूण आयात वाढली

जून महिन्यातील घसरणीनंतरही, २०२५-२६ या चालू तेल वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६) एकत्रित आयात वाढून १०५.७ लाख टन झाली आहे. ती मागील वर्षाच्या याच कालावधीत ९९.५५ लाख टन होती. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, चालू तेल वर्षात वनस्पती तेलाची एकूण आयात जास्त राहिली असली, तरी जून महिन्यातील मोठ्या घसरणीमुळे एकत्रित वाढीचा वेग मंदावला आहे, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं का? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर