देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज; स्वस्तात होणार प्रवास 
राष्ट्रीय

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज; स्वस्तात होणार प्रवास

भारतीय रेल्वे लवकरच देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशात हायड्रोजन या इंधनावर चालणारी ट्रेन सुरू होणार असून स्वच्छ आणि हरित पर्यायांचा वापर केला जाणार आहे. जिंद हरयाणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जुलै रोजी या ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

Mayuri Gawade

चंदिगढ : भारतीय रेल्वे लवकरच देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशात हायड्रोजन या इंधनावर चालणारी ट्रेन सुरू होणार असून स्वच्छ आणि हरित पर्यायांचा वापर केला जाणार आहे. जिंद हरयाणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जुलै रोजी या ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत मार्गावर हायड्रोजन ट्रोन धावणार आहे. डिझेल, कोळसा किंवा वीज या सर्व पर्यायांसह आणखी एक पर्याय आता उपलब्ध झाला आहे. मे महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. रेल्वे प्रशासनाने १,२०० किलोवॅट हायड्रोजन प्रोप्लशन सिस्टिमसह १० डब्यांच्या स्वदेशी हायड्रोजन ट्रेन सेटला मंजुरी दिली होती. ताशी ७५ किमी वेगाने ही ट्रेन धावणार आहे.

खिशाला परवडणाऱ्या दरात प्रवास

जिंद आणि सोनिपतदरम्यान ९० किमी लांब मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. एका वेळी या ट्रेनमध्ये ६८२ प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनची चाचणीसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून या मार्गाची निवड करण्यात आली आहे. तिकिटांचे दर ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत तिकीट दर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या दरात नागरिकांना हायड्रोजन ट्रेनने प्रवास करता येणार आहे. यामुळे ९० किलोमीटर अंतर केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. या मार्गावर एकूण १२ थांबे असतील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

व्यापारी जहाजावर हल्ला; ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता; भारताकडून तीव्र निषेध

सरकार सुस्त, विरोधक निष्प्रभ

आजचे राशिभविष्य,१३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पावसाळ्यात आवर्जून खा करटोलीची भाजी; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Monsoon Makeup Tips : पावसातही मेकअप राहील परफेक्ट; लक्षात ठेवा 'या' ७ गोष्टी