ताशी ११० किमी तास वेगाने हायड्रोजन ट्रेन धावणार; रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांचे प्रतिपादन संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

ताशी ११० किमी तास वेगाने हायड्रोजन ट्रेन धावणार; रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांचे प्रतिपादन

भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ताशी ११० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावविण्याचे प्रयत्न भारतीय रेल्वेकडून सुरू आहेत.

Swapnil S

इंदूर : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ताशी ११० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावविण्याचे प्रयत्न भारतीय रेल्वेकडून सुरू आहेत. या ट्रेनची ताशी १२० किलोमीटर वेगाने चाचणी पूर्ण झाली असून, त्यानंतर आता कमाल ११० किलोमीटर प्रतितास वेगाने ती चालविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी रविवारी दिली.

पत्रकारांशी बोलताना कुमार म्हणाले, हायड्रोजन ट्रेनचा परिचालन वेग ताशी ७५ किमी ठेवला आहे. मात्र, ताशी १२० किलोमीटर वेगाने तिच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर कमाल ११० किलोमीटर प्रतितास वेगाने ही ट्रेन चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवीन हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वेमार्गांवर चालवायची, याबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी तांत्रिक बाबी तसेच इंधनाच्या पुरवठ्याची व्यवस्था यांचाही आढावा घेतला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य

महाराष्ट्र स्वतंत्र डेटा सेंटर धोरण तयार करणार