Photo : X
राष्ट्रीय

भारताने अमेरिकेकडे नोंदवला निषेध

ओमानच्या किनाऱ्याजवळ २४ भारतीय कर्मचारी असलेल्या व्यावसायिक टँकरवर अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारताने बुधवारी अमेरिकेचे चार्ज डी'अफेअर्स जेसन मीक्स यांना पाचारण केले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर जहाजावरील २४ कर्मचाऱ्यांपैकी तीन जण बेपत्ता झाले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ २४ भारतीय कर्मचारी असलेल्या व्यावसायिक टँकरवर अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारताने बुधवारी अमेरिकेचे चार्ज डी'अफेअर्स जेसन मीक्स यांना पाचारण केले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर जहाजावरील २४ कर्मचाऱ्यांपैकी तीन जण बेपत्ता झाले आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना नवी दिल्लीने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील व्यावसायिक जहाज वाहतुकीवर आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विनाअडथळा वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत झाली पाहिजे.

ओमानच्या किनाऱ्याजवळ 'सेट्टेबेलो' या व्यावसायिक जहाजावर झालेला हा हल्ला, दोन दिवसांपूर्वी पलाऊ-ध्वज असलेल्या जहाजावर अमेरिकन नौदलाने केलेल्या हल्ल्यानंतर झाला आहे. त्या जहाजावरही २४ भारतीय कर्मचारी होते आणि ते जहाज इराणच्या बंदरांवरील अमेरिकन नाकेबंदीतून निसटण्याचा प्रयत्न करत होते.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे की, "आम्ही आज ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक जहाज 'सेट्टेबेलो'वर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. जहाजावरील २४ भारतीय कर्मचाऱ्यांपैकी २१ जणांची आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आली असून तीन भारतीय अद्याप बेपत्ता आहेत."

मंत्रालयाने पुढे सांगितले की, ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेत स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार