गुंतवणूकदारांचे एका दिवसात ८.९६ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाने शेअर बाजारात घसरण 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

गुंतवणूकदारांचे एका दिवसात ८.९६ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाने शेअर बाजारात घसरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अंतरिम करार 'संपुष्टात' आल्याचे जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. या भूराजकीय घडामोडींमुळे बुधवारी (दि. ८) भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आणि अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे ८.९६ लाख कोटी रुपये बुडाले.

Swapnil S

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अंतरिम करार 'संपुष्टात' आल्याचे जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. या भूराजकीय घडामोडींमुळे बुधवारी (दि. ८) भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आणि अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे ८.९६ लाख कोटी रुपये बुडाले.

बीएसई सेन्सेक्स १,६७७.१२ अंकांनी (२.१५ टक्क्यांनी) घसरून ७६,५०३.६० वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारादरम्यान तो १,९२१.६९ अंकांनी (२.४५ टक्क्यांनी) घसरून ७६,२५९.०३ वर पोहोचला होता. एनएसई निफ्टी ५१६.६५ अंकांनी (२.१२ टक्क्यांनी) घसरून २३,८८२.०५ वर बंद झाला.

आशियाई बाजारांमध्ये, दक्षिण कोरियाचा 'कोस्पी' ५.३५ टक्क्यांनी घसरला, जपानचा 'निक्केई २२५' निर्देशांक २.११ टक्क्यांनी घसरला.

बाजार कोसळण्याचे मुख्य कारण

ऑनलाइन ट्रेडिंग आणि वेल्थ टेक फर्म 'एनरिच मनी'चे सीईओ पोन्मुडी आर. यांनी बाजारातील या घसरणीचे विश्लेषण करताना सांगितले, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यावसायिक जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अंतरिम शांतता करार 'संपला' असल्याचे जाहीर केले. यामुळे जागतिक भूराजकीय तणाव पुन्हा वाढला असून जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे. या वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास ७ टक्क्यांची तीव्र वाढ झाली, ज्याचे तीव्र झटके जागतिक वित्तीय बाजारपेठांना बसले आणि भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री झाली. तीव्र झटके जागतिक वित्तीय बाजारपेठांना बसले.

कच्च्या तेलाच्या किमती दोन आठवड्यांच्या उच्चांकावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम "संपला" असल्याचे घोषित केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात खनिज तेलाच्या (क्रूड ऑईल) किमती ६ टक्क्यांहून अधिक वाढल्या असून त्यांनी बुधवारच्या व्यवहारात दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा सुरू झालेल्या लष्करी हल्ल्यांमुळे पश्चिम आशियामधून होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची भीती पुन्हा निर्माण झाली आहे.

रॉयटर्सने 'पीव्हीएम'चे विश्लेषक तामस वर्गा यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आज सकाळीही तेजी कायम राहिली. इराणने हॉरमुझच्या सामुद्रधुनीतून केवळ तेहरानने निश्चित केलेला मार्गच सुरक्षित असल्याचे घोषित केल्यानंतर, चार तेल आणि गॅस टँकर्सनी एकतर सामुद्रधुनीतून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे किंवा त्यांना माघारी फिरणे भाग पडले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:२८ वाजता इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर ब्रेंट क्रूड ऑईलचा सर्वाधिक सक्रिय असलेला सप्टेंबरचा वायदा (कॉन्ट्रॅक्ट) ६% वाढीसह $७८.६७ प्रति बॅरलवर व्यवहार करत होता; तत्पूर्वी व्यवहारात त्याने $७९.२६ प्रति बॅरल हा दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर, सर्वाधिक सक्रिय असलेला जुलैचा वायदा दिवसाच्या सुरुवातीला ७,२१८ रुपये प्रति बॅरल या दोन आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर ७% वाढीसह ७,१८५ रुपये प्रति बॅरलवर व्यवहार करत होता.

रुपया घसरला

मुंबई : अमेरिकेने इराणवर नवीन हल्ले चढवले. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि डॉलर मजबूत झाला, परिणामी बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ५९ पैशांनी घसरून ९५.५५ वर बंद झाला. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९५.१५ वर होता. मंगळवारी, रुपया ४७ पैशांनी मजबूत होता.

सोने दर कमी

नवी दिल्ली : सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवत, राष्ट्रीय राजधानीत बुधवारी ९९.९ टक्के शुद्धतेच्या या पिवळ्या धातूची किंमत मंगळवारच्या बंद पातळी १,४९,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवरून ८०० रुपयांनी घसरून १,४८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. चांदीचे दर प्रति किलोग्राम २,३९,८०० रुपयांवर स्थिर राहिले. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे धातूवर दबाव राहिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण