‘तारा’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (Photo-X/@SpokespersonMoD)
राष्ट्रीय

‘तारा’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाकडे आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. गुरुवारी ओदिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या ‘टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन’ (तारा) या नवीन ‘ग्लाइड’ शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी पार पडली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताने संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाकडे आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. गुरुवारी ओदिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या ‘टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन’ (तारा) या नवीन ‘ग्लाइड’ शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी पार पडली.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘तारा’ ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड वेपन सिस्टम आहे. ही प्रणाली जुन्या आणि अनगाइडेड (नियोजित लक्ष्याशिवाय असलेल्या) युद्धनौकांवरील किंवा विमानांवरील दारुगोळ्याला ‘प्रिसिजन गाइडेड वेपन्स’ म्हणजेच अचूक मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये रूपांतरित करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.

जमिनीवरील शत्रूच्या लक्ष्यांना अचूकपणे टिपण्यासाठी आणि कमी खर्चात अधिक मारक क्षमता मिळवण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. हे पहिलेच असे ‘ग्लाइड वेपन’ आहे ज्यामध्ये अत्यंत आधुनिक पण कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीची रचना आणि विकास हैदराबाद येथील 'रिसर्च सेंटर इमारात' आणि डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांनी संयुक्तपणे केला आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून कौतुक

या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल आणि या प्रकल्पाशी संबंधित उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स