जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही; अमेरिकेच्या राजदूतांना दुसऱ्यांदा बजावले समन्स 
राष्ट्रीय

जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही; अमेरिकेच्या राजदूतांना दुसऱ्यांदा बजावले समन्स

ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या व्यावसायिक जहाजांवर अमेरिकन सैन्याने केलेले प्राणघातक हल्ले हे ‘अस्वीकारार्ह’ असल्याचे स्पष्ट करीत भारताने शुक्रवारी अमेरिकेचे प्रभारी राजदूत (चार्ज डी अफेअर्स) जेसन मीक्स यांना पुन्हा समन्स बजावले आणि तीव्र आक्षेप नोंदवला.

Swapnil S

नवी दिल्ली : ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या व्यावसायिक जहाजांवर अमेरिकन सैन्याने केलेले प्राणघातक हल्ले हे ‘अस्वीकारार्ह’ असल्याचे स्पष्ट करीत भारताने शुक्रवारी अमेरिकेचे प्रभारी राजदूत (चार्ज डी अफेअर्स) जेसन मीक्स यांना पुन्हा समन्स बजावले आणि तीव्र आक्षेप नोंदवला.

अमेरिकेच्या या कारवाईत एका टँकरवरील तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याचे सरकारने स्पष्ट केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते. यापूर्वी बुधवारी रात्रीही मीक्स यांना समन्स बजावण्यात आले होते.

हल्ल्यांबद्दल नोंदविला तीव्र निषेध

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ओमानच्या आखातात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर अमेरिकन नौदलाने सुरू ठेवलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांच्याकडे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे आधीच तीन निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे, जो अत्यंत क्लेशदायक आणि टाळता येण्याजोगा होता.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण