भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर X (PiyushGoyal)
राष्ट्रीय

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

भारत आणि अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या मुख्य विषयांचा आढावा घेतला आहे. यामध्ये बाजारपेठेतील सुधारित प्रवेश, डिजिटल व्यापार आणि व्यापारविषयक गैर-शुल्क अडथळे कमी करणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या मुख्य विषयांचा आढावा घेतला आहे. यामध्ये बाजारपेठेतील सुधारित प्रवेश, डिजिटल व्यापार आणि व्यापारविषयक गैर-शुल्क अडथळे कमी करणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. येथे पार पडलेल्या दोन दिवसीय मंत्रीस्तरीय बैठकीत या विषयांवर चर्चा झाल्याचे अधिकृत निवेदनात बुधवारी सांगण्यात आले.

ही बैठक वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांच्यात पार पडली.

व्यापार चर्चेचा समारोप

भारत आणि अमेरिकेने बुधवारी प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याबाबतची दोन दिवसीय मंत्रीस्तरीय चर्चा पूर्ण केली. या कराराचा आराखडा यावर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता.

अमेरिकेने २४ फेब्रुवारी रोजी सर्व व्यापारी भागीदार देशांवर लादलेले १० टक्के तात्पुरते शुल्क २४ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. हे शुल्क कालबाह्य होण्यापूर्वीच चर्चा पूर्ण करण्यावर दोन्ही बाजूंचा भर आहे.

Mumbai : ॲॅक्वा मेट्रोतून ७.२ कोटी जणांचा प्रवास; वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

दूध उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

एअर इंडिया, अकासाचा प्रवास महागणार

महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; दुष्काळाचे संकट गडद, कोकण-गोव्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा