राष्ट्रीय

भारतीय सैन्याच्या बदनामीचा डाव फसला! इस्रायलनंच केला खुलासा, म्हटले- ‘महिला सैनिकावर अत्याचार’ची तर 'फेक न्यूज'

हे वृत्त "फेक न्यूज" असल्याचे इस्रायली दूतावासाने ठामपणे सांगितले. तसेच, इस्रायल-भारत यांच्यातील दृढ संबंधांवर अशा अपप्रचाराचा काहीही परिणाम होणार नाही, हे संबंध इतके मजबूत आहेत की द्वेष करणारे हे तोडू शकत नाहीत आणि म्हणूनच फेक न्यूजचा आधार घेत आहेत. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत"

Krantee V. Kale

जम्मू-काश्मीरमधील जम्मू भागात झालेल्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) च्या महिला सैनिकावर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणारे पत्र परराष्ट्र मंत्रालयाला पाठवण्यात आल्याचा दावा खोटा असल्याचे इस्रायली दूतावासाने बुधवारी स्पष्ट केले. हे वृत्त "फेक न्यूज" असल्याचे इस्रायली दूतावासाने ठामपणे सांगितले. तसेच, इस्रायल-भारत यांच्यातील दृढ संबंधांवर अशा अपप्रचाराचा काहीही परिणाम होणार नाही, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल कथित पत्रावर इस्रायलचे माजी भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांची सही असल्याचा दावा केला जात होता. इस्रायली दूतावासाने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) यावर स्पष्टीकरण देताना, "अविश्वसनीय! इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध इतके मजबूत आहेत की द्वेष करणारे हे तोडू शकत नाहीत आणि म्हणूनच फेक न्यूजचा आधार घेत आहेत. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत," असे म्हटले आहे.

नेतान्याहू आणि मोदींची फोनवर चर्चा

यापूर्वी, २४ एप्रिल रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधून जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. चर्चेदरम्यान "पंतप्रधान मोदी यांनी सीमापार दहशतवादी हल्ल्याचे 'अमानुष स्वरूप' अधोरेखित केले आणि गुन्हेगारांना व त्यांच्या समर्थकांना न्यायापर्यंत पोहोचवण्याचा भारताचा ठाम निर्धार व्यक्त केला, अशी माहिती त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैस्वाल यांनी 'एक्स' वर दिली होती.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन पठारावर पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या भूमिकेविरोधात कठोर पावले उचलली आहेत.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी