इराणचे कच्चे तेल सात वर्षांनंतर भारतात; दोन मोठी जहाजे भारतीय बंदरांत दाखल 
राष्ट्रीय

इराणचे कच्चे तेल सात वर्षांनंतर भारतात; दोन मोठी जहाजे भारतीय बंदरांत दाखल

इराणकडून कच्च्या तेलाची आयात सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. इराणचे दोन टँकर्स भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांत दाखल झाले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : इराणकडून कच्च्या तेलाची आयात सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. इराणचे दोन टँकर्स भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांत दाखल झाले आहेत.

'नॅशनल इरानियन टँकर कंपनी'द्वारे चालवले जाणारे 'फेलिसिटी' हे जहाज रविवारी उशिरा गुजरातच्या सिक्का बंदरात पोहोचले. यामध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल आहे. त्याच वेळी, 'जया' नावाचे दुसरे जहाज ओदिशाच्या पारादीप बंदराजवळ नांगरले गेले आहे. अमेरिकेने गेल्या महिन्यात दिलेल्या ३० दिवसांच्या विशेष सवलतीनंतर ही खेप भारतात पोहोचली आहे. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती.

पारादीप बंदराचे कामकाज प्रामुख्याने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पाहते. आयओसीने या सवलतींतर्गत इराणकडून किमान एक खेप खरेदी केल्याची पुष्टी केली आहे. दुसरीकडे, सिक्का बंदर हे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत पेट्रोलियम यांच्यासाठी महत्त्वाचे केंद्र आहे.

२०१८ मध्ये अमेरिकेने निर्बंध कडक केल्यानंतर मे २०१९ पासून भारताने इराणकडून तेल आयात करणे थांबवले होते. २०१७-१८ दरम्यान भारताच्या तेल आयातीपैकी ११.५ टक्के वाटा एकट्या इराणचा होता.

कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

CBSE चा मोठा निर्णय! २०२७ पासून DigiLocker वर मिळणार तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती, वाचा सविस्तर

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण