राष्ट्रीय

The Kashmir Files : स्वतःची लाज वाटली पाहिजे; असे म्हणत इस्त्रायलच्या राजदूताने नदव लॅपिड यांना लिहिले खुले पत्र

'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला वलगर आणि प्रोपगेंडा म्हणणाऱ्या इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांना इस्त्रायलच्या भारतीय राजदूताने दिला समज

प्रतिनिधी

'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गोव्यातील 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये ज्युरी हेड असलेल्या नदव लॅपिड यांनी हा चित्रपट वलगर आणि प्रोपगेंडा असल्याचे म्हंटले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाला अटोन्ड फुटलं. भारतातील अनेक नेते, अभिनेते कलाकार याबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. अशामध्ये नदव लॅपिड यांना समज देणारे एक खुले पत्र इस्त्रायलचे भारतामधील राजदूत नाओर गिलॉन यांनी लिहिले आहे. यामध्ये त्यांनी तब्बल ११ ट्विट करत, लॅपिड यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे असे म्हणत त्यांचे कां टोचले आहेत.

राजदूत नाओर गिलॉन म्हणाले आहेत की, "भारतीय संस्कृतीमध्ये पाहुणे हे देवाप्रमाणे असतात असं म्हणतात. पण, भारतामधील ‘इफ्फी’साठीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिलेल्या आमंत्रणाचा मान तू ठेवला नाही. असे बोलून तू भारतीयांचा विश्वास, सन्मान आणि पाहुणचाराचा अपमान केला. दोन्ही देशांमधील प्रेम आणि नातेसंबंध साजरे करण्याच्या दृष्टीने तुला या कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते." असे म्हणतात नदव लॅपिडवर टीका केली.

पुढे त्यांनी म्हंटले की, "मी तुला इतकाच सल्ला देईन की यापूर्वीही तू ज्याप्रकारे उघडपणे भाष्य केले आहे त्याप्रमाणे इस्त्रायलमधील घडामोडींबद्दल नाराजी व्यक्त करु शकतोस किंवा टीका करु शकतो. मात्र त्याचा संताप तू इतर देशांमध्ये जाऊन अशाप्रकारे व्यक्त करु नये. तू अशाप्रकारे तुलना करण्यामागील नेमकी करणे आणि मुद्दे काय आहेत? मला याची कल्पना नाही. तू इस्रायलला जाऊन विचार करशील की तू फार बोल्ड आणि मोठे विधान केले. मात्र आम्ही इस्रायलचे येथील प्रतिनिधी इथेच वास्तव्यास आहोत."

“भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील मैत्री आणि नाते संबंध फार मजबूत आहेत. हे संबंधांवर तुझ्या विधानांमुळे परिणाम होणार नाहीत. एक व्यक्ती म्हणून मला फार लाज वाटत आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या मोबदल्यात, मैत्रीच्या बदल्यात आपण त्यांच्यावर जी टीका केली आहे त्यासाठी मी आपलं आदरातिथ्य करणाऱ्या देशाची माफी मागू इच्छितो,” असं गिलॉन शेवटच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले