राष्ट्रीय

जयपूरमधील लग्नसोहळ्यात पर्सची चोरी; ४ लाखांची रोकड आणि दागिने लंपास, आरोपीचा शोध सुरू; CCTV फुटेज व्हायरल

७ फेब्रुवारी रोजी जगतपूरा परिसरातील 'चंदन वन मॅरेज गार्डन' येथे नवीन करोल यांचा विवाहसोहळा सुरू होता. रात्री सुमारे १०.१५ वाजता...

किशोरी घायवट-उबाळे

राजस्थानची राजधानी जयपूर येथील लग्नसमारंभात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात पाहुण्यासारख्या आलेल्या एका व्यक्तीने नवरीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी जगतपूरा परिसरातील 'चंदन वन मॅरेज गार्डन' येथे नवीन करोल यांचा विवाहसोहळा सुरू होता. रात्री सुमारे १०.१५ वाजता नवरा-नवरी स्टेजवर उभे राहून पाहुण्यांसोबत फोटो काढत होते.

याच वेळी एक व्यक्ती ब्लेझर हातात घेऊन स्टेजवर गेला. त्याने नवरीच्या मागे खुर्चीजवळ ठेवलेली पर्स उचलली. लगेच ती पर्स ब्लेझरमध्ये लपवून तो शांतपणे तिथून निघून गेला. त्यावेळी गर्दी असल्यामुळे कोणालाही चोरी झाल्याचे लक्षात आले नाही.

सीसीटीव्हीत घटना कैद

पर्स सापडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी सीसीटीव्ही आणि लग्नाचे व्हिडिओ तपासले. त्यात संबंधित व्यक्ती पर्स लपवून नेताना स्पष्ट दिसत आहे. पर्समध्ये दागिने आणि सुमारे ४ लाख रुपयांची रोख रक्कम होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

याप्रकरणी वराचा भाऊ नितीन करोल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटल्याचे सांगितले असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास करत असताना विवाहस्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे मोठ्या लग्नसमारंभांमध्ये सुरक्षेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि सीसीटीव्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स