JEE Main 2026 Results : ‘जेईई मेन २०२६’च्या सत्र-१ चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्यासह १२ जणांना १०० पर्सेंटाईल 
राष्ट्रीय

JEE Main 2026 Results : ‘जेईई मेन २०२६’च्या सत्र-१ चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्यासह १२ जणांना १०० पर्सेंटाईल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ‘जेईई मेन २०२६’ सत्र-१ चा निकाल सोमवारी जाहीर केला आहे. यंदा १२ उमेदवारांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहे. यात महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ‘जेईई मेन २०२६’ सत्र-१ चा निकाल सोमवारी जाहीर केला आहे. यंदा १२ उमेदवारांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहे. यात महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्याचबरोबर ही परीक्षा दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी ९६.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

‘एनटीए’ने २१ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘जेईई मेन २०२६’ सत्र-१ ची परीक्षा आयोजित केली होती. बीई आणि बी.टेक प्रोग्राम्समध्ये प्रवेश देणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण १३,५५,२९३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३,०४,६५३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात भारतातील सर्व उमेदवार तसेच काठमांडू, दुबई आणि कुवेतसारख्या परदेशी केंद्रांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. एकूण उमेदवारांपैकी ९६.२६ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, असे ‘एनटीए’ने सांगितले.

मुंबईतील माधव विराडियाला १०० पर्सेंटाईल

महाराष्ट्रात मुंबईतील माधव विराडिया याला १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. त्याच्यासह श्रेयस मित्रा (दिल्ली), नरेंद्र बाबू (आंध्र प्रदेश), शुभमकुमार (बिहार), कबीर छिल्लर (राजस्थान) चिरंजीब कार (राजस्थान), भावेश पात्रा (ओदिशा), अनय जैन (हरयाणा), अर्णव गौतम (राजस्थान), पासला मोहित (आंध्र प्रदेश), पुरोहित निमय (गुजरात) आणि विवान माहेश्वरी (तेलंगण) यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत.

एप्रिलमध्ये आणखी संधी

‘जेईई मेन २०२६’ सत्र-१ परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये आणखी एक संधी मिळणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन्ही सत्रांमधील सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे, ते सत्र-२ साठी नोंदणी करू शकतात. एप्रिलची परीक्षा २ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी ही आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा