न्या. रवींद्र घुगे यांच्या पदोन्नतीची शिफारस 
राष्ट्रीय

न्या. रवींद्र घुगे यांच्या पदोन्नतीची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून चार न्यायाधीशांच्या पदोन्नतीची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून चार न्यायाधीशांच्या पदोन्नतीची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याचेही या बैठकीत सुचवण्यात आले.

दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्या. अश्विनी कुमार मिश्रा यांची याच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक