राष्ट्रीय

लोकसभेसाठी कंगना उत्सुक; भाजपकडून मंडीतून लढण्याचे दिले संकेत

एका चॅनेलला कंगनाने मुलाखत दिली. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं तोंडभरून कौतुक केलं.

वृत्तसंस्था

अभिनेत्री कंगना रणावतने लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिल्यास हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

एका चॅनेलला कंगनाने मुलाखत दिली. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं तोंडभरून कौतुक केलं. आपला कोणीच विरोधक नाही हे मोदींना चांगलं माहिती आहे. राहुल गांधींचा सामना हा राहुल गांधींशीच आहे. त्यामुळे मोदींना कणखर विरोधक नाही. अनेक लोक आपल्याला राजकारणात येण्याविषयी विचारत असतात. मलाही निवडणूक लढवायला आवडेल,’’ असंही कंगनाने म्हटले आहे.

बॉलिवूडबद्दल कंगना म्हणाली, ‘‘सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे, मात्र हे फार काळ चालणार नाही. कारण लोक बदलत आहेत. प्रेक्षक जागरूक झाले तर ही घराणेशाही संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.’’

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली