Karnataka : विजयपुरा येथील भूतनाळ तलावात आढळले आईसह पाच मुलांचे मृतदेह  X| व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

Karnataka : विजयपुरा येथील भूतनाळ तलावात आढळले आईसह पाच मुलांचे मृतदेह

कर्नाटकातील विजयपुरा येथील भूतनाळ तलावात एक महिला आणि तिच्या पाच लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Swapnil S

विजयपुरा : कर्नाटकातील विजयपुरा येथील भूतनाळ तलावात एक महिला आणि तिच्या पाच लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून या महिलेने आपल्या मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शोभा (३५) असे मृत महिलेचे नाव असून, विद्या (१५), सुवर्णा (१३), टिप्पराया (१२), सनिका (१०) आणि विकास (६) अशी मृत मुलांची नावे आहेत.

घटना काय?

२४ ऑगस्ट रोजी कौटुंबिक वादातून शोभा आपल्या चार मुलांना घेऊन घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिने वसतिगृहात असलेल्या तिच्या सर्वात लहान (कर्णबधिर) मुलालाही सोबत घेतले. शोभा यांच्या पतीने (मल्लिकार्जुन जालागेरी - शेतमजूर) यासंदर्भात विजयपुरा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, त्या महिलेने आपला मोबाईल फोन घरीच सोडल्यामुळे त्यांचा सुगावा लागणे कठीण झाले होते.

सामूहिक आत्महत्या

बुधवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास तलावात सहा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. विजयपुराच पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी ही सामूहिक आत्महत्येची घटना असल्याचे दिसते. मात्र, फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका

मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

Mumbai : रेल्वे स्थानक परिसर विकासाचे लक्ष्य; आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश; मुलुंड, भांडूप, कांजूरला दिली भेट

गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप