फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठीच! ७३ वर्षीय महिलेने शिकवला 'नागरिक शिस्ती'चा धडा; Video व्हायरल  
राष्ट्रीय

फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठीच! ७३ वर्षीय महिलेने शिकवला 'नागरिक शिस्ती'चा धडा; Video व्हायरल

केरळमधील कोझिकोड येथे ७३ वर्षीय महिलेने दाखवलेल्या धाडसाची देशभरात चर्चा सुरू आहे. फुटपाथवरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला रोखत त्यांनी नागरिक शिस्तीचा संदेश दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

Mayuri Gawade

व्हायरल व्हिडिओ मध्ये काय दिसतं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रभावती अम्मा फुटपाथवरून चालत असताना समोरून एक दुचाकीस्वार येताना दिसतो. रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने तो फुटपाथवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रभावती अम्मा त्याचा मार्ग अडवतात. संबंधित व्यक्ती अनेकदा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्या ठामपणे उभ्या राहतात. शेवटी दुचाकीस्वार मागे वळतो आणि रस्त्याने निघून जातो.

'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत प्रभावती अम्मा यांनी सांगितले की, नागरिक शिस्त भंग करणाऱ्यांना त्या यापूर्वीही समज देत आल्या आहेत. संबंधित दुचाकीस्वार मागे हटत नसल्याने त्यांनी त्याचा फोटो काढण्याचा इशारा दिला, तसा तो मागे फिरला.

प्रभावती अम्मा या एकट्याच राहत असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी केरळमधील विविध वसतिगृहांमध्ये अधीक्षिका म्हणून काम केले आहे. तरुणपणी त्या डाव्या विचारसरणीशी संबंधित चळवळींमध्ये सक्रिय होत्या.

पोलिसांकडून गौरव

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी त्यांच्या धाडसाची दखल घेत सत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांसाठीच असतात, हा साधा पण महत्त्वाचा नियम त्यांनी कृतीतून अधोरेखित केला आहे.

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’

दोडक्या बहिणींकडून वसुलीची प्रक्रिया सुरू

चुका केल्या, पण कारणे तांत्रिक; नार्वेकरांचा खुलासा

Mumbai : पहिल्याच पावसात पोलखोल! सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत; महापौरांच्या देखतच मुकादम पडला उघड्या मॅनहोलमध्ये

लग्न करायचे नव्हते तर सियाने तसे का सांगितले नाही? केतन अगरवालच्या वडिलांचा शोकसंतप्त सवाल