घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यामधील 'अभूतपूर्व' विलंबावर आक्षेप घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यामधील 'अभूतपूर्व' विलंबावर आक्षेप घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सीमांकनाच्या कोणत्याही नवीन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, देशावर दूरगामी परिणाम करणाऱ्या 'घटनादुरुस्ती विधेयकावर' घाईघाईने निर्णय लादण्याचा कोणताही प्रयत्न करू नका, असा इशाराही खर्गे यांनी मोदींना दिला आहे.

मोदींना पाठवलेल्या पत्रात खर्गे यांनी नमूद केले की, १३ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी (साईन डाय) संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत ६४ दिवस झाले आहेत, तरीही संसदेची दोन्ही सभागृहे अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेली नाहीत. ही परिस्थिती 'अभूतपूर्व' आहे, सीमांकनावर कोणतेही घटनादुरुस्ती विधेयक आणण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत आपण सर्वप्रथम ११ एप्रिल रोजी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.

पुरेसा वेळ हवा

राजकीय पक्षांना एकमेकांसोबत चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही घाईघाईने घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या विधेयकाचा योग्य तोच निकाल लागला. तसा प्रकार कृपया पुन्हा करू नका, असा इशारा खर्गे यांनी दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत