नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (९८) यांना छातीत संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहेत.
अडवाणी सध्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात असून, न्यूरोलॉजीचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अडवाणी यांना शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जसोल विहर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.