पेपरफुटीविरोधी विधेयकाला मंजुरी; दोषींना आता १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ५० लाखांपर्यंत दंड 
राष्ट्रीय

पेपरफुटीविरोधी विधेयकाला मंजुरी; दोषींना आता १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ५० लाखांपर्यंत दंड

विरोधी पक्षांच्या तीव्र घोषणाबाजीत आणि गदारोळात लोकसभेने बुधवारी पेपरफुटीविरोधी कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली. या नव्या सुधारित कायद्यात दोषींना १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कडक शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या तीव्र घोषणाबाजीत आणि गदारोळात लोकसभेने बुधवारी पेपरफुटीविरोधी कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली. या नव्या सुधारित कायद्यात दोषींना १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कडक शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे.

'सार्वजनिक परीक्षा (गैरमार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६' हे कडक शिक्षेची तरतूद असणारे विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी २७ जुलै रोजी सभागृहात मांडले होते. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या व्यापक आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता; त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांतच हे विधेयक संसदेत आणले गेले.

लोकसभेत जितेंद्र सिंह म्हणाले की, नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारने तत्परतेने पावले उचलली आहेत. सिंह यांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षांत पेपरफुटीमुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. विधेयक संमत झाल्यानंतर लगेचच लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट

मध्य रेल्वेवर दररोज ११ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी