Kolkata : ममता बॅनर्जीच्या पायाच्या दुखापतीची होणार नव्याने चौकशी - मुख्यमंत्री 
राष्ट्रीय

Kolkata : ममता बॅनर्जीच्या पायाच्या दुखापतीची होणार नव्याने चौकशी - मुख्यमंत्री

२०२१ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायाला झालेल्या दुखापतीबाबत केलेल्या कथित 'खोट्या दाव्यांची' नव्याने चौकशी केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली.

Swapnil S

कोलकाता : २०२१ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायाला झालेल्या दुखापतीबाबत केलेल्या कथित 'खोट्या दाव्यांची' नव्याने चौकशी केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. पत्रकार परिषदेत अधिकारी यांनी, ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान दुखापतीचे नाटक केले होते, असा दावा केला.

२०२१ मध्ये नंदीग्राममधील प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पायाला झालेल्या दुखापतीचे नाटक केले होते. आमच्याकडे वैद्यकीय अहवाल आहे, ज्यामध्ये फॅक्चर किंवा हाड सरकल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले होते. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करणार आहोत, असे अधिकारी म्हणाले. यावेळी त्यांनी बांगूर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सने जारी केलेला बॅनर्जीचा वैद्यकीय अहवालही उपस्थितांना दाखवला.

नेमकी घटना काय

तब्बल पाच वर्षांपूर्वी, १० मार्च २०२१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधील रेयापारा (बिरुलिया) भागात डाव्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली होती. ममता यांनी सुरुवातीला दावा केला होता की, काही अज्ञात लोकांनी त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या खुल्या कारच्या दारावर ढकलले, ज्यामुळे दार त्यांच्या डाव्या पायावर जोरदार आपटले आणि गर्दीत पाय मुरगळला. त्यानंतर रुग्णालयातून जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात त्यांनी सांगितले होते की, समर्थकांना अभिवादन करत असताना प्रचंड गर्दी कारवर लोटल्यामुळे त्यांचा पाय दाबला गेला आणि दुखापत झाली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट