मंगला एक्स्प्रेसमध्ये २५ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली 
राष्ट्रीय

मंगला एक्स्प्रेसमध्ये २५ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या काही विद्यार्थ्यांनी भोपाळ रेल्वे स्थानकावर जेवण घेतल्यानंतर २५ ते ३० जणांची प्रकृती बिघडली. यातील ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यासोबत डॉक्टरांचे पथक सोबत दिले आहे.

Swapnil S

जळगाव : दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या काही विद्यार्थ्यांनी भोपाळ रेल्वे स्थानकावर जेवण घेतल्यानंतर २५ ते ३० जणांची प्रकृती बिघडली. यातील ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यासोबत डॉक्टरांचे पथक सोबत दिले आहे.

ही घटना रेल्वे प्रशासनास कळताच रेल्वे प्रशासनाने भुसावळ स्थानकावर वैदयकीय पथक तैनात करत त्यांना वैदयकीय उपचार व आवश्यक ती औषधे दिली जेवणातून विषबाधा झाली असण्याचा संशय व्यक्त केला आहे. दिल्लीहून त्रिचूर येथे शैक्षणि सहलीसाठी एकूण ९३ विद्यार्थी व १२ शिक्षक मंगला एक्स्प्रेसने निघाले आहेत. यातील २५ ते ३० विद्यार्थ्यांनी भोपाळ रेल्वे स्टेशनवर जेवण घेतले. त्यांना उलटी व मळमळचा त्रास सुरू झाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका