मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू X|@kartikeya_1975
राष्ट्रीय

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला असून, कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात सशस्त्र गटांमध्ये झालेल्या संघर्षात तीन जण ठार झाले आहेत.

Swapnil S

इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला असून, कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात सशस्त्र गटांमध्ये झालेल्या संघर्षात तीन जण ठार झाले आहेत. कुकीबहुल जिल्ह्यातील कामजोंग नागा-बहुभूमिक चासाद गावात झालेल्या संघर्षात एका २२ वर्षीय तरुणाचा आणि ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा या महिलेच्या मानेवर गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला पाच मुलांची आई असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेच्या हत्येनंतर कुकी आणि नागा सशस्त्र गटांमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला, जो शनिवारी सकाळीही सुरूच होता. या चकमकीत आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला असून, १० घरे जाळण्यात आली आहेत.

पुढील हिंसाचार रोवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चासाद पोलीस गेट जंक्शनच्या ४०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६२ नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहेत. दुसऱ्या एका घटनेत, उखरुड जिल्ह्यात संदीप राय (वय ४०) या व्यक्तीच्या गाडीवर संशयित दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, कांगपोकपी जिल्ह्यातील मकुई अशांग आणि तापोन येथेही सशस्त्र गटांमध्ये जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

मणिपूरमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये कुकी आणि नागा समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून डझनभर घरे जाळण्यात आली आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका! दीपके, रांका, दास यांची विमानातच धरपकड; चार माजी मुख्यमंत्र्यांना केले स्थानबद्ध, दिल्लीत सात हजार आंदोलक ताब्यात

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

Satara : माण, खटाव, फलटण, खंडाळ्यात भीषण स्थिती

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स