मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली. 
राष्ट्रीय

मोदींची फेसबुक पोस्ट हटवल्याप्रकरणी मेटाने मागितली माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुकवरील पोस्ट काही काळासाठी हटवल्याप्रकरणी मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली आहे. त्याचबरोबर बाल लैंगिक शोषण, डीपफेक आणि कंटेंट मॉडरेशनच्या चुकांची कबुली देत, एका विशिष्ट प्रकारच्या कंटेंटला बूस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे ...

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुकवरील पोस्ट काही काळासाठी हटवल्याप्रकरणी मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली आहे. त्याचबरोबर बाल लैंगिक शोषण, डीपफेक आणि कंटेंट मॉडरेशनच्या चुकांची कबुली देत, एका विशिष्ट प्रकारच्या कंटेंटला बूस्ट (प्रचार) करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले गेले होते, अशी कबुलीही मेटाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी बुधवारी दिली.

३ दिवसांचा अल्टिमेटम

सरकारी सूत्रांनुसार, व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कंटेंटला प्रोत्साहन दिले गेले आणि विशिष्ट प्रेक्षकवर्गाला लक्ष्य करून पैसे घेऊन प्रमोशन केले गेले, हे मेटाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. संसदीय स्थायी समितीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत मार्क झुकरबर्ग यांना तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत.

माफी न मागितल्यास त्यांना आयटी कायद्याच्या कलम ७९(३) अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण काढून घेतले जाईल आणि त्यांच्यावर प्रकाशक म्हणून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. मेटाने या सर्व त्रुटींबद्दल आणि चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, या मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा बोलावले जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन