राष्ट्रीय

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

जन्माष्टमीच्या रात्री मुजफ्फरनगरमध्ये मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Mayuri Gawade

कृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं रस्त्यातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात समोर आला आहे. तीन तरुणांनी मुलीला जबरदस्तीने एका घरात नेल्याचा आरोप असून, त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मंदिराच्या वाटेतूनच अपहरण

ही घटना छपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.०४) जन्माष्टमीच्या रात्री पीडित मुलगी घराजवळील मंदिरात दर्शनासाठी जात होती. यावेळी समीर, वलीम आणि सलमान या तिघांनी तिचं रस्त्यातून अपहरण केल्याचा आरोप आहे.यानंतर मुलीला समीरच्या घरात नेण्यात आलं. तिथे समीरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांचा शोध

मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी तिचा शोध सुरू केला. अखेर ती समीरच्या घरात भयभीत अवस्थेत आढळल्याचं वृत्त आहे. त्यानंतर मुलीने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी समीरला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपी फरार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

कठोर कारवाईची मागणी

या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. योग साधना आश्रमाचे महंत स्वामी यशवीर महाराज यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई आणि कठोर दंडात्मक कारवाईची मागणी केली.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिल्याचंही वृत्त आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले