राष्ट्रीय

मोदींचे इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स; डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या जवळपासही नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा डिजिटल टप्पा ओलांडला असून इन्स्टाग्रामवर १० काेटी फॉलोअर्स मिळवणारे मोदी हे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा डिजिटल टप्पा ओलांडला असून इन्स्टाग्रामवर १० काेटी फॉलोअर्स मिळवणारे मोदी हे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत. मोदी यांनी सोशल मीडियावर कहर केला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इन्स्टाग्रामवर मोदींच्या जवळपासही नाहीत. ट्रम्प यांच्यापेक्षा मोदींच्या फॉलोअर्सची संख्या दुप्पट आहे.

यामुळे जागतिक स्तरावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची अतुलनीय कामगिरी अधोरेखित झाली आहे. मोदी यांनी २०१४ मध्ये इन्स्टाग्राम सुरू केले होते. तेव्हापासून त्यांचे फॉलोअर्स सातत्याने वाढत होते. आता त्यांचे अकाऊंट हे जगातील सर्वात जास्त फॉलो केले जाणारे आणि व्यस्त राजकीय प्रोफाइलपैकी एक म्हणून ओळखले जात आहे.

मोदींचे इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स

ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स

या कामगिरीसह, मोदी आता इन्स्टाग्रामवरील जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधानांच्या फॉलोअर्सची संख्या ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट आहे. ट्रम्प ४३.२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदी यांच्या तुलनेत इतर जागतिक नेते खूप मागे आहेत. यात इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो १५ दशलक्ष फॉलोअर्स, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा १४.४ दशलक्ष फॉलोअर्स, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान ११.६ दशलक्ष आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांचे ६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

पोस्ट होतात व्हायरल

या व्यासपीठाचा वापर अधिकृत कार्यक्रमांची माहिती, आंतरराष्ट्रीय भेटी, सार्वजनिक संपर्क उपक्रम, सांस्कृतिक क्षण आणि वैयक्तिक विचार सामायिक करण्यासाठी केला जातो. यामुळे विस्तृत आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षकांशी जोडण्यास मदत होते. मोदी यांनी एखादा व्हिडीओ, फोटो किंवा पोस्ट शेयर केली की लगेच काही सेकंदात लाइक्स, कमेंट्स आणि शेअरचा पाऊस पडतो. करोडोच्या संख्येने फॉलोअर्स मोदी यांच्या पोस्ट शेअर करत असतात.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको