शांघाय परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उद्या जाणार संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

शांघाय परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उद्या जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून उझबेकिस्तान आणि किरगिझस्तान या दोन मध्य आशियाई देशांच्या ४ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून उझबेकिस्तान आणि किरगिझस्तान या दोन मध्य आशियाई देशांच्या ४ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते उझबेकिस्तानसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणार असून किरगिझस्तानमध्ये आयोजित ‘शांघाय सहकार्य संघटनेच्या’ वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदला भेट देतील. मोदींचा हा चौथा उझबेकिस्तान दौरा आहे. ताश्कंदमध्ये मोदी उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव्ह यांच्यासोबत एकमेकांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सविस्तर चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, शिक्षण आणि दोन्ही देशांतील नागरकांमधील परस्पर संबंध अधिक बळकट करण्यावर या बैठकीत भर दिला जाईल. ‘विकसित भारत २०४७’ आणि ‘उझबेकिस्तान-२०३०’ या दोन्ही देशांच्या सहकार्यात्मक दृष्टीकोनावरही दोन्ही नेते विचारमंथन करतील. ताश्कंद दौऱ्यादरम्यान मोदी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला भेट देतील आणि ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमधील महात्मा गांधी केंद्राची पाहणी करतील.

दौऱ्याच्या दुसरा टप्प्यात मोदी उझबेकिस्तानचा दौरा आटोपून किरगिझस्तानचे अध्यक्ष सादिर झापारोव्ह यांच्या निमंत्रणावरून बिश्केक येथे जाण्यासाठी रवाना होतील. बिश्केकमध्ये आयोजित २५ व्या 'शांघाय सहकार्य संघटनेच्या' शिखर परिषदेत मोदी सहभागी होतील. २०१७ मध्ये भारत 'एससीओ'चा पूर्णवेळ सदस्य झाला आहे. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) आणि संधी या मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडतील. याशिवाय, मध्य आशियातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव मानल्या जाणाऱ्या 'सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्स'च्या उद्घाटनालाही पंतप्रधान उपस्थित राहतील.दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी सांगितले की, दहशतवाद, फुटीरतावाद आणि जहालवाद या आव्हानांचा सामना करणे हे 'एससीओ'चे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे आणि या परिषदेत प्रादेशिक सुरक्षेवर सखोल चर्चा केली जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

शासन व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेची निवड

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचा; एकनाथ शिंदेंची घोषणा, भाजपमध्ये चलबिचल 

'मराठी'साठी एक वर्षाची मुदतवाढ; फडणवीसांची घोषणा; रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी?