खासदारसंख्या वाढवण्यासाठी संसदेचे विशेष सत्र  (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

खासदारसंख्या वाढवण्यासाठी संसदेचे विशेष सत्र

लोकसभेतील सदस्य संख्या ८१६ पर्यंत वाढवून महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा भरविण्यात येणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेतील सदस्य संख्या ८१६ पर्यंत वाढवून महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा भरविण्यात येणार आहे. सरकारने विरोधी पक्षांना १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय सत्राबाबत प्राथमिक माहिती दिल्याचे समजते.

संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना आगामी सत्राचे संकेत दिले होते. संसदेच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, गुरुवारी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब होणार होते. मात्र, आता प्रस्तावित विधेयकासाठी हे विशेष सत्र बोलावण्यात येत आहे.

काही महत्त्वाची विधेयके आणि मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सभागृह लवकरच पुन्हा भरेल. आगामी दोन-तीन आठवड्यांत आम्ही एक अत्यंत महत्त्वाचे विधेयक मांडणार आहोत, ज्याची कल्पना आम्ही विरोधी पक्षांनाही दिली आहे, असे रिजिजू म्हणाले.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

IDBI Bank Privatisation: मोठी बातमी! IDBI बँकेतील हिस्सा फेअरफॅक्सला विकणार; तब्बल ५२,८७८ कोटी रुपयांची डील

विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश

Mumbai : तीन डोमिनोज आऊटलेट्ससह १७ खाद्य परवाने निलंबित

Mumbai : स्क्रीन टाईम, जंक फूडमुळे बाल लठ्ठपणा वाढतोय; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० प्रकरणे नोंदवली