पेन्शनधारकांना अधिक परतावा; नव्या गुंतवणूक पर्यायांचा समावेश करण्यासाठी PFRDA ची समिती स्थापन 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

पेन्शनधारकांना अधिक परतावा; नव्या गुंतवणूक पर्यायांचा समावेश करण्यासाठी PFRDA ची समिती स्थापन

पेन्शनधारकांना अधिक परतावा मिळण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन विविध मालमत्ता प्रकारांचा समावेश करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने समिती स्थापन केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पेन्शनधारकांना अधिक परतावा मिळण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन विविध मालमत्ता प्रकारांचा समावेश करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने समिती स्थापन केली आहे.

कोणत्याही अस्थिरतेशिवाय दीर्घ कालावधीत निरंतर आणि स्थिर वाढ देऊ शकतील अशा नवीन मालमत्ता आवश्यक आहेत. एका वर्षात खूप जास्त परतावा दाखवून त्यानंतर त्यात मोठी घसरण होणे ही स्थिती परवडू शकत नाही. अशी अस्थिरता आम्हाला टाळायची आहे, असे पीएफआरडीएचे अध्यक्ष एस. रमण यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

आम्ही स्थापन केलेली समिती विविध मालमत्ता प्रकारांच्या दीर्घकालीन समावेशाचा विचार करत आहे. यासाठी आम्ही जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या पेन्शन फंडांच्या अनुभवातून शिकत आहोत. मला खात्री आहे की, आम्ही एक उत्तम आणि सुलभ मार्ग शोधून काढू. याद्वारे आम्ही एनपीएसधारकांना मिळणारा परतावा स्थिर आणि वाढणारा असेल हे सुनिश्चित करू शकू, असे ते म्हणाले.

पीएफआरडीएच्या 'किमान आश्वासित पेन्शन' योजनेच्या प्रस्तावाबाबत विचारले असता रमण म्हणाले की, हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. आम्ही निश्चितपणे खासगी क्षेत्रासाठी 'युनिफाइड पेन्शन स्कीम'च्या संकल्पनेचा विचार करत आहोत. एखाद्याकडे हमी देणारी योजना असेल तर ती समजणे अधिक सोपे जाते, असे सांगत त्यांनी जोखीम आणि परतावा यामध्ये समतोल राखण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अटल पेन्शन योजनेप्रमाणेच निश्चित परताव्यासाठी कोणालातरी हमी द्यावी लागेल जिथे सरकार हमी देते आणि त्याचा खर्च सोसते, असे त्यांनी सांगितले.

बिगर-शासकीय क्षेत्रासाठी एनपीएसवर केंद्रित असलेल्या प्रयत्नांबद्दल रमण म्हणाले की, पीएफआरडीए समाजातील विविध उप-विभागांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही एक उप-विभाग तयार केला आहे. छोटे एमएसएमई आणि बचत गटदेखील आहेत.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड