तुकडे-तुकडे गँगला तृणमूलचा पाठिंबा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात (संग्रहित फोटो)
राष्ट्रीय

तुकडे-तुकडे गँगला तृणमूलचा पाठिंबा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागापासून तोडण्याची धमकी देणाऱ्या ‘तुकडे-तुकडे गँग’ला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

Swapnil S

सिलिगुडी : ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागापासून तोडण्याची धमकी देणाऱ्या ‘तुकडे-तुकडे गँग’ला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

उत्तर बंगालमधील सिलिगुडी येथील कावाखाली मैदानावर आयोजित निवडणूक सभेत ते बोलत होते. तृणमूल काँग्रेस आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या गँगला रस्त्यापासून संसदेपर्यंत साथ देत असून, हाच या पक्षाचा खरा चेहरा असल्याची टीका मोदी यांनी केली.

ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉरचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमध्ये ‘डबल इंजिन’ सरकार निवडून देण्याचे आवाहन करतानाच, भाजपचे सरकार आल्यास बंगालचा विकास दुप्पट वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तृणमूल काँग्रेसने आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात राज्याचा विनाश केला असून, केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्याने केवळ २५ टक्क्यांहून कमी काम पूर्ण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

मदरशांसाठी ६ हजार कोटी दिले

मदरशांच्या विकासासाठी तृणमूल सरकारने ६,००० कोटी रुपयांची तरतूद केली, मात्र संपूर्ण उत्तर बंगालसाठी अपुरा निधी दिल्याची टीका मोदी यांनी केली. तृणमूल काँग्रेस हा आदिवासी, महिला आणि युवक विरोधी पक्ष असल्याचे सांगतानाच, लोकांचा उत्साह पाहून आगामी निवडणुकीत या पक्षाचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिलिगुडीमध्ये २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके