सोने खरेदी टाळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुन्हा आवाहन (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

सोने खरेदी टाळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुन्हा आवाहन

जागतिक पातळीवरील उलथापालथ, भू-राजकीय संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर ७.८ टक्के जीडीपी गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेचे कौतुक केले.

Swapnil S

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील उलथापालथ, भू-राजकीय संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर ७.८ टक्के जीडीपी गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेचे कौतुक केले.

विकास दराची ही गती कायम ठेवायची असल्यास परदेशी न जाण्याचे, परदेशात लग्नसमारंभ न आयोजित करण्याचे किंवा सोने न खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकांनी भारतातच लग्न सोहळे आयोजित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’वर ‘झूठ की गूंज’ असे म्हणत जोरदार निशाणा साधला. या नवीन जीडीपी वृद्धी दराने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या ‘निराशावादाचा’ बुरखा फाडला आहे. भारताला विकास दर कायम ठेवण्यासाठी अधिक स्वावलंबन व 'स्वदेशी'च्या दिशेने कार्य करत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अखेर गुन्हे मागे! CJP आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ५ सप्टेंबरचा मोर्चा स्थगित

अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई

Nepal Floods : नेपाळमधील मृतांचा आकडा एक हजारावर; जवळपास ४ हजार जण अद्याप बेपत्ता

OBC बैठकीतून तीन मंत्र्यांचा सभात्याग; भुजबळ, पाटील, राठोड आक्रमक

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्राप्रकरणी तडजोडीला स्थगिती