Bihar : "हिंमत असेल तर मला बळजबरीने बाहेर काढून दाखवा"; राबडीदेवींचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान 
राष्ट्रीय

Bihar : "हिंमत असेल तर मला बळजबरीने बाहेर काढून दाखवा"; राबडीदेवींचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना थेट आव्हान दिले आहे. गेल्या दशकभरापासून माझ्या ताब्यात असलेला सरकारी बंगला हिंमत असेल तर बळजबरीने खाली करून दाखवावा, असा आक्रमक पवित्रा राबडी देवी यांनी घेतला आहे.

Swapnil S

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना थेट आव्हान दिले आहे. गेल्या दशकभरापासून माझ्या ताब्यात असलेला सरकारी बंगला हिंमत असेल तर बळजबरीने खाली करून दाखवावा, असा आक्रमक पवित्रा राबडी देवी यांनी घेतला आहे.

पाटण्यातील '१०, सर्कुलर रोड' हा बंगला दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नंदकिशोर राम यांना प्रलंबित आदेशानुसार पुनर्रचना करून देण्यात आला आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आरजेडी नेत्या राबडी देवी यांचा पारा चांगलाच चढला.

१९९७ ते २००५ या काळात सलग आठ वर्षे बिहारचे मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या राबडी देवी म्हणाल्या, नुकतेच मुख्यमंत्री झालेले सम्राट चौधरी सध्या प्रचंड उत्साहात असल्याचे मला दिसत आहे. त्यांना माझ्यावर बळजबरीने कारवाई करून मला घरातून बाहेर काढू द्या, मी स्वतःहून हा बंगला अजिबात खाली करणार नाही. आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी असलेल्या राबडी देवी यांनी हा संतप्त प्रतिक्रिया दिल्लीहून पाटणा विमानतळावर परतताना दिली.

मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला आणि रागाच्या भरात प्रसारमाध्यमांचे माईक बाजूला सारले. सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात माझ्याच मंत्रिमंडळात मंत्री म्हणून केली होती, याची आठवण त्या नेहमी करून देत असतात.

काय आहे बंगल्याचा वाद?

राजभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेला '१०, सर्कुलर रोड' हा बंगला तत्कालीन नितीश कुमार सरकारने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला दिला होता. हा बंगला केवळ आरजेडीच्या 'प्रथम कुटुंबाचे' निवासस्थान नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय जनता दलाच्या राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र राहिला आहे.

काही महिन्यांपूर्वी, सम्राट चौधरी यांनी राज्याची धुरा सांभाळण्यापूर्वीच, भवन निर्माण विभागाने एक आदेश जारी केला होता. या आदेशानुसार, सदर बंगला यापुढे केवळ 'उपमुख्यमंत्र्यांसाठीच' राखीव ठेवला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. राबडी देवी या सध्या राज्य विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आहेत. त्यामुळे त्यांना या बंगल्याऐवजी 'हार्डिंग रोड'वरील दुसरा बंगला घेण्यास सांगण्यात आले होते. तथापि, आदेशानंतरही त्यांनी हा बंगला सोडला नाही. त्यांचे धाकटे चिरंजीव आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना अधिकृतपणे '१, पोलो रोड' हा बंगला मिळाला असला, तरी तेही आपला बहुतांश वेळ आई-वडिलांसोबत याच '१०, सर्कुलर रोड'च्या बंगल्यात घालवतात.

देशांतर्गत पर्यटकांकडून यंदाच्या उन्हाळ्यात लक्झरी हॉटेलची मागणी वाढली; पर्यटकांकडून नजीकच्या ठिकाणांना अधिक पसंती

Mumbai : वांद्रे येथे विनापरवानगी २५० ड्रोन्स उडवले; दोघांवर गुन्हा दाखल

३२० मीटर लांब सायकल ट्रॅक, पादचारी, पर्यटकांसाठी रस्ता ; कोस्टल रोड प्रकल्पात नव्याने समावेश; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता

उरणवर पाणीसंकटाचे सावट; रानसई धरण आटले, मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू

Mumbai : गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका; पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, BMC चा प्रस्ताव आयुक्तांना सादर