विद्यार्थी आंदोलनाच्या आड येऊ नका - राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

विद्यार्थी आंदोलनाच्या आड येऊ नका - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मार्गात अडथळा आणू नये, कारण हे विद्यार्थी देशाचा खरा आवाज आहेत, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी यांनी बुधवारी दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मार्गात अडथळा आणू नये, कारण हे विद्यार्थी देशाचा खरा आवाज आहेत, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी यांनी बुधवारी दिला. एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी १० जनपथ येथे भेट दिली, त्यानंतर गांधी यानी हा इशारा दिला.

व्हडीओ पुरावा द्या, प्रत्येक दोशीला शिक्षा होणारच

राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी पोलिसांनाही सांगू इच्छितो की, मी प्रत्येक विद्यार्थ्याला व्हिडिओ बनवून पुरावे आपल्याकडे सुरक्षित ठेवण्यास आणि आम्हाला पाठवण्यास सांगितले आहे. जेव्हा हे संपूर्ण प्रकरण संपेल, तेव्हा आम्‍ही न्याय मिळवून देऊ आणि आपल्या मुलांवर हात उगारणाऱ्या दोषींना, वरपासून खालपर्यंत म्हणजेच नरेंद्र मोदी, अमित शहा, ज्ञानेश कुमार यांच्यापासून ते प्रत्येकाला शिक्षा करू.

शेर आणि शेरनी

काँग्रेसची युवा संघटना 'एनएसयूआय'च्या विद्यार्थ्यांसह या आंदोलनात जखमी झालेल्या मुलांना राहुल गांधींनी धीर दिला. पंतप्रधान कार्यालयापासून ते सामान्य पोलिसापर्यंत ज्यांनी-ज्यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांवर अत्याचार केले आहेत, त्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. काही जखमी विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्यावर कसा "अमानुष" अत्याचार करण्यात आला, याचे भीषण वर्णन केले. यावर राहुल गांधींनी मुलांना धीर देत सांगितले की, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राहुल गांधींनी या विद्यार्थ्यांना त्यांचे "शेर" आणि "शेरनी" असे संबोधले.

एका विद्यार्थिनीचा परिचय करून देत राहुल गांधी म्हणाले, "ही आमची शेरनी आहे. तिला मारहाण करण्यात आली, पण ती अजिबात घाबरली नाही. तिच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. "मी माझ्या पत्रकार परिषदेत जसे म्हटले, हा भारत देश आहे. अमित शहाजी, कृपया लक्ष देऊन पाहा, हे सर्वजण एकत्र उभे आहेत. येथे कोणताही मुस्लिम नाही, हिंदू नाही, कोणतीही जात नाही, कोणतेही लिंग नाही... हे सर्व एकत्र आहेत. हेच आपले हिंदुस्थान आहे," असे म्हणत राहुल गांधींनी सर्व जखमी विद्यार्थ्यांना एकत्र खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आवाहन केले.

हा एकच आवाज आहे - भारताचा आवाज आणि तुम्ही या आंदोलनासमोर व आवाजासमोर उभे आहात. पंतप्रधान या आवाजासमोर उभे आहेत, अमित शहा या आवाजासमोर उभे आहेत. माझा पंतप्रधानजींना सल्ला आहे की त्यांनी या आवाजासमोर उभे राहू नये. त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही, असेही गांधी म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

दिव्यांगाना जन्मापासून पेन्शन; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

महागाईचा आगडोंब! सप्टेंबरमध्ये नवीन मालिकेतील चलनवाढीचा उच्चांकी दर

Navi Mumbai : डाळिंबाचा दर दुप्पट; पपई, केळी, संत्रीही महागली