राष्ट्रीय

भाजपकडून 'झूट की गूंज' वेबसाइटचा दाखला; राहुल गांधींवर तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ (विद्यार्थ्यांचा आवाज) या अभियानादरम्यान त्यांनी केलेल्या विधानांची तथ्य-तपासणी (फॅक्ट-चेक) करणाऱ्या एका वेबसाइटचा दाखला देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुरुवारी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ (विद्यार्थ्यांचा आवाज) या अभियानादरम्यान त्यांनी केलेल्या विधानांची तथ्य-तपासणी (फॅक्ट-चेक) करणाऱ्या एका वेबसाइटचा दाखला देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुरुवारी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी देशातील तरुणांची दिशाभूल करत असून, आता त्यांच्या प्रत्येक ‘असत्याला’ सत्याच्या आणि तथ्यांच्या आधारे उत्तर दिले जाईल, असे भाजपने म्हटले आहे.

शॉक ट्रिटमेंट

भाजपने आपल्या प्रवक्त्यांच्या फौजेला मैदानात उतरवत राहुल गांधींवर चौफेर हल्ला चढवला. राहुल यांची विधाने ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या ‘नैराश्यातून आणि मत्सरातून’ येत असल्याचे त्यांनी सांगितले. या नेत्यांनी ‘झूट की गूंज’ नावाच्या वेबसाइटचा उल्लेख राहुल गांधी यांच्या अभियानाची ‘शॉक ट्रिटमेंट’ असा केला असून, आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरून या वेबसाइटची लिंकही शेअर केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या मत्सर आणि नैराश्यातून राहुल गांधी हे असत्याचे झेंडेधारक बनले आहेत. त्यांनी कितीही असत्य पसरवले, तरी आता प्रत्येक खोटेपणा तथ्यांच्या आधारे उघडा पाडला जात आहे. ‘झूट की गूंज’ ही वेबसाइट गांधी यांच्या दाव्यांची पोलखोल करत आहे. राहुल गांधींना जेवढे असत्य बोलायचे आहे तेवढे बोलू द्या, आता त्यांच्या प्रत्येक असत्याला तथ्यांसह उत्तर दिले जाईल. जेवढ्या वेगाने त्यांचा प्रचार गुंजेल, तितक्याच मोठ्या आवाजात त्याविरोधात सत्य समोर येईल, असे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

‘झूट की गूंज’ वेबसाइट

राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानांची पडताळणी करते. रोजगार, नीट परीक्षेचा खर्च आणि महिलांवरील अत्याचार यांसारख्या मुद्द्यांवर गांधी यांनी केलेल्या दाव्यांची पुराव्यांसहित माहिती या वेबसाइटवर देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर या अभियानांतर्गत कार्यक्रम घेतले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेचा दिलासा

वृद्ध वडिलांना न्यायालयात खेचणाऱ्या मुलाला ५ लाखांचा दंड

Mumbai : चार उपाहारगृहांचे परवाने FDA कडून रद्द; अस्वच्छता, अन्न भेसळ आढळल्याने केली कारवाई

Mumbai : ... म्हणून साहित्य पुरवता आले नाही; पालिका प्रशासनाच्या अजब उत्तरावर शिक्षण समितीचे सदस्य संतप्त

मुंबईत 'पार्किंग' महागणार, १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव; पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी होणार सादर