राष्ट्रीय

नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार

वृत्तसंस्था

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे, तसेच न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीसही बजावली आहे. सुनावणीदरम्यान नुपूर यांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानातून रचल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, न्यायालय पुढील सुनावणीदरम्यान सर्व प्रकरणे हस्तांतरित करण्याचा विचार करू शकते. नुपूर यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान हे प्रकरण दिल्ली हायकोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कोर्टातील सुनावणीदरम्यान अधिवक्ता मानवेंद्र सिंह म्हणाले की, नुपूर यांना कलम २१च्या आधारे दिलासा मिळायला हवा. यासाठी त्यांनी अजमेरच्या खादिम चिश्तींच्या व्हिडीओसह अनेक प्रकरणांचा संदर्भ दिला, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

अजब पालिकेचा गजब कारभार! CSMT स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती; नव्या लाद्या काढून पुन्हा नवीनच लाद्या बसवण्याचे काम

शिवसेना खरी कोणाची यावरील दक्षिण मुंबईचा कौल निर्णायक!

गिलचे अतिकौतुक महागात पडेल; श्रीकांत यांची टीका, ऋतुराजला राखीव खेळाडूंतूनही वगळल्यामुळे नाराजी

डबेवाला कामगार पुतळा हटवण्याच्या हालचाली : १ मे रोजी पुतळा झाकून ठेवल्याने अभिवादन करता आले नाही; डबेवाल्यांनी व्यक्त केली खंत

...अन्यथा चर्चगेट स्थानक जप्त करू; पश्चिम रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका