राष्ट्रीय

आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री, सेन्सेक्समध्ये झाली घसरण

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील कमजोर स्थिती आणि आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्या्या पार्श्वभूमीवर सोमवारी सेन्सेक्स ८७ अंकांनी घसरला.

दि ३० बीएसई सेन्सेक्स ८६.६१ अंक किंवा ०.१६ टक्का घसरुन ५४,३९५.२३ वर बंद झाला. दिवसभरात तो ३९१.३१ अंक किंवा ०.७१ टक्का घसरुन ५४,०९०.५३ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४.६० अंक किंवा ०.०३ टक्का घसरुन १६,२१६ वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत भारती एअरटेला समभाग सर्वाधिक घसरला. तर त्यानंतर टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, लार्सन ॲण्ड टुब्रो आणि पॉवरग्रीड यांच्या समभागातही घसरण झाली. अपेक्षित नफा न मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर टीसीएसचा समभाग ४.६४ टक्के घसरला. तर टाटा स्टील, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंटस‌् आदी कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. तिमाही निकाला अपेक्षेप्रमाणे नफा मिळत नसल्याने आयटी कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीचा मारा झाला. आशियाई बाजारात शांघाय, सेऊलमध्ये घसरण तर टोकियोमध्ये वाढ झाली. तसेच युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.४८ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव १०६.३ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु असून त्यांनी शुक्रवारी १०९.३१ कोटींच्या समभागांची विक्री केली.

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, संजय निरुपम यांचा दावा

लष्करातील जवानाने EVM मध्ये फेरफार करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले २.५ कोटी!

भारतीय पडले यूपीआयच्या प्रेमात; ५० टक्क्याने व्यवहार वाढले

निवडणूक काळात मोबाईल टॉवरसह इंटरनेट सेवा बंद करा

'सगेसोयरे मॅनेजमेंट' निवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न; हा नवा पॅटर्न कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार