राष्ट्रीय

शिमल्यात शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू ; ढिगाऱ्याखाली आणखी भाविक अडकल्याची शक्यता

या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तर मृतांची संख्या वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवशक्ती Web Desk

हिमाचल प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. हिमाचलच्या शिमल्यात भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. हे शिवमंदिर दरडीखाली गाडलं गेलं आहे. यात २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तर मृतांची संख्या वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेवर हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे नऊ मृतदेह ठिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. श्रावण सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

शिमल्याचे एसपी संजीव कुमार गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार या भूस्खलनात एक शिवमंदिर कोसळलं. आजुबाजुच्या इमारतींनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी अनेक लोक अडकले आहेत. शिव मंदिराच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती संजीव कुमार यांनी व्यक्त केली आहे. या परिसरात अजूनही दरड कोसळत असल्याने बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या