PTI
राष्ट्रीय

सिद्धरामय्यांचा राजीनामा; कर्नाटकात अखेर नेताबदल, शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री

कर्नाटकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेला गुरुवारी अखेर पूर्णविराम मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर सातत्याने दावा सांगणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Swapnil S

बंगळुरू : कर्नाटकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेला गुरुवारी अखेर पूर्णविराम मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर सातत्याने दावा सांगणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत लोक भवनात उपस्थित नसल्यामुळे सिद्धरामय्या यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सादर केला. त्यानंतर सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार स्वतंत्रपणे दिल्लीला रवाना झाले.

कर्नाटकच्या राज्यपालांचे विशेष सचिव प्रभू शंकर यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांचा (मुख्यमंत्रीपदाचा) राजीनामा आपल्याकडे प्राप्त झाला आहे. परंतु राज्यपाल परतल्यानंतरच ते तो स्वीकारू शकतात. दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत हे संध्याकाळपर्यंत बंगळुरूला परततील. आता डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो.

सिद्धरामय्या यांनी गुरुवारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सकाळच्या न्याहरीच्या वेळी बैठकीला पाचारण केले. त्या बैठकीतच सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीबद्दल काही माहितीही मंत्र्यांना दिल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सहकारी या बैठकीला उपस्थित होते.

सिद्धरामय्या- शिवकुमार गळाभेट

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे सिद्धरामय्या यांच्या ‘कावेरी’ या निवासस्थानी पोहोचले होते. ब्रेकफास्ट बैठकीदरम्यान सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांना नमस्कार केला. याआधी शिवकुमार यांच्या समर्थकांनी बंगळुरूमधील त्यांच्या घरी भेट देऊन मिठाईचे वाटप केले.

Mumbai : उष्माघातामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन; हीट स्ट्रोकचा वाढता धोका, डॉक्टरांचा इशारा

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज; १५ जूनपासून विशेष वेळापत्रक लागू, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

विषारी दारू प्रकरणाने पुणे हादरले; ८ जण ताब्यात, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नवी मुंबई महापालिकेचा करवसुलीचा मार्ग मोकळा; टीटीसी एमआयडीसीतील मालमत्ताकरावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

वेंगुर्ला-वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर परप्रांतीय भूमाफियांचा पुन्हा हैदोस; कांदळवन नष्ट करून जमीन बळकावण्याचे प्रकार