विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश

नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे बंद किंवा मागे घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्यांना आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे बंद किंवा मागे घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्यांना आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला दिली आहे. यासोबतच न्यायालयाने स्पष्ट केले की, आंदोलनावरील आदेशातील 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' या शब्दाचा अर्थ केवळ गंभीर आणि निर्घृण गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांशीच संबंधित आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जोयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस अत्याचारांविरोधात दाखल विविध याचिकांवर सुनावणी सुरू होती.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आणि इतर कोणत्याही राज्याला आंदोलकांवरील गुन्हे कायद्यानुसार बंद किंवा मागे घेण्याचे स्वातंत्र्य आहे. 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' या शब्दाचा अर्थ फक्त गंभीर आणि निर्घृण गुन्हे असाच समजला जावा. सुनावणीच्या सुरुवातीला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले की, ज्यांच्यावर गंभीर आणि हिंसक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशा २,७०० हून अधिक व्यक्तींवरील मागे घेतले जाणार नाहीत. मात्र, सामान्य विद्यार्थ्यांवर ही कारवाई केली जाणार नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता