संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

लोकपालांच्या ‘त्या’ आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; केंद्रालाही बजावली नोटीस

लोकपालांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारीची सुनावणी करणे ही एक अतिशय त्रासदायक बाब आहे, असे स्पष्ट करत लोकपालच्या आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकपालांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारीची सुनावणी करणे ही एक अतिशय त्रासदायक बाब आहे, असे स्पष्ट करत लोकपालच्या आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. इतकेच नव्हे, लोकपालने ज्या न्यायाधीशांविरुद्ध तक्रार ऐकली त्यांचे नाव उघड करण्यासही खंडपीठाने मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदाराला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे नाव गुप्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाविरुद्धच्या तक्रारीची लोकपालांनी सुनावणी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताच्या लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात येतात की नाही या मुद्द्यावर गुरुवारी सुनावणी केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत आणि न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारीची सुनावणी लोकपाल करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ही एक अत्यंत त्रासदायक बाब असल्याचे म्हटले आहे.

हायकोर्ट न्यायाधीशाविरुद्धच्या तक्रारीची लोकपालांकडून सुनावणी

लोकपाल कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात येतात, असे २७ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील लोकपालने आपल्या आदेशात म्हटले होते. एका खासगी कंपनीशी संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि दुसऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लोकपालने देशाच्या सरन्यायाधीशांकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले होते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत गुरुवारी लोकपालच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी