राष्ट्रीय

मोदी-नेतन्याहू यांच्यात फोनवरुन चर्चा ; कठीण काळात सोबत असल्याचा दिला विश्वास

नवशक्ती Web Desk

हमाससोबत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरुन चर्चा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत लिहिल आहे की, "मला फोन करुन परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल मी पंतप्रधान नेतन्याहूंचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो."

पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) रोजी इस्त्रायलवर रॉकेट हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रॉकेट हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं होतं. इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्लाने धक्का बसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटलं होतं.

एसोसिएटेड प्रेस या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले वाढवले आहेत. गाझामधील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या हल्लात ६८० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३७०० हून अधिक जखमी झाले आहेत. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलममध्ये ९००हून अधिक जणांचे जीव गेले आहेत.

सुरु त्यांनी केलं संपवणार आम्ही

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायलय याच्यातील संघर्ष तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या ९००हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ५००हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे. हे युद्ध आम्ही सुरु केले नाही. पण या युद्धाचा शेवट मात्र आम्ही करु, असं म्हणत त्यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस