मुंबई : टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट मधील अंतर्गत वाद आता आणखी तीव्र झाला असून, टाटा सन्सचे नामांकित संचालक आणि विश्वस्त वेणू श्रीनिवासन यांनी महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
श्रीनिवासन यांनी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’च्या प्रशासकीय कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांची कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून झालेली नियुक्ती आणि त्यांच्या मुलाची (नेविल टाटा) झालेली वर्णी यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
वेणू श्रीनिवासन यांची मुख्य तक्रार काय?
श्रीनिवासन यांच्या मते, टाटा ट्रस्ट्सने व्यावसायिक आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये (जसे की टाटा सन्सच्या व्यवहारांत) थेट हस्तक्षेप करू नये. यामुळे ट्रस्टच्या मूळ धार्मिक/धर्मादाय उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
प्राप्तिकर कायदा, २०२५ नुसार नोंदणीकृत नफा-रहित संस्थांना व्यावसायिक कार्यात थेट सहभाग घेण्यास मर्यादा आहेत. अशा हस्तक्षेपांमुळे ट्रस्टची कर सवलत रद्द होऊन प्रचंड कर आकारणीचा बोजा पडू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांच्या स्वतंत्र मताला डावलण्यासाठी आणि ठराविक विश्वस्तांच्या हातात सर्व अधिकार केंद्रित करण्यासाठी परिपत्रकाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
धर्मादाय आयुक्तांकडे केल्या मागण्या
‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’च्या च्या प्रशासनाची आणि सुकाणू रचनेची उच्चस्तरीय चौकशी करावी.
नोएल टाटा यांची कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून असलेली स्थिती आणि नेविल टाटा यांच्या नियुक्तीभोवतीच्या परिस्थितीची छाननी करावी.
टाटा सन्सशी संबंधित कोणत्याही निर्णयामध्ये किंवा प्रतिनिधी नेमण्याच्या प्रक्रियेमध्ये नोएल टाटा यांना सहभाग घेण्यापासून किंवा मतदान करण्यापासून रोखावे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’च्या बोर्डाची रचना जैसे थे ठेवावी.
टाटा सन्सवरील नियंत्रण : टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्सची ६६ टक्के हिस्सेदारी आहे.
वादग्रस्त निर्णय : टाटा सन्सच्या प्रस्तावित शेअर बाजारातील सूचीकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणलेला परिपत्रक ठराव क्र. १०७
एन. चंद्रशेखरन यांची पुनरावृत्ती : वेणू श्रीनिवासन यांनी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या ५ वर्षांच्या तिसऱ्या टर्मच्या पुनरावणुकीला आणि लिस्टिंग प्रक्रियेला पाठिंबा दिला. त्याला नोएल टाटांचा विरोध होता.
सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टने व्यावसायिक बाबींमध्ये थेट हस्तक्षेप करणे योग्य नाही. यामुळे ट्रस्टच्या कायदेशीर तरतुदींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.वेणू श्रीनिवासन, विश्वस्त आणि टाटा सन्सचे नामांकित संचालक