अखेर स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१ ए' आकाशात झेपावले; भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल | IAF
राष्ट्रीय

अखेर स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१ ए' आकाशात झेपावले; भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल

नाशिकच्या ओझरमधील ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ची (एचएएल) निर्मिती असलेल्या ‘तेजस एमके-१ ए’ या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाने शुक्रवारी आकाशात झेप घेतली आणि देशाच्या संरक्षण इतिहासात एक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा शुक्रवारी पार पडला.

Swapnil S

नाशिक : नाशिकच्या ओझरमधील ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ची (एचएएल) निर्मिती असलेल्या ‘तेजस एमके-१ ए’ या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाने शुक्रवारी आकाशात झेप घेतली आणि देशाच्या संरक्षण इतिहासात एक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा शुक्रवारी पार पडला. आजच्या सोहळ्याद्वारे हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय हवाई दलात अधिकृतपणे दाखल झाले. ‘तेजस’ची प्रात्यक्षिके बघितल्यानंतर माझी छाती गौरवाने फुलून गेल्याचे भावोद्गार राजनाथ सिंह यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी घटना म्हणून आजच्या सोहळ्याची नोंद झाली. ‘एचएएल’च्या ओझर युनिटमधून सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले ‘तेजस’ आकाशात झेपावले. याप्रसंगी ‘एचएएल’च्या नवीन उत्पादन साखळीचे उद्घाटनही करण्यात आले. ‘तेजस’ विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या जलतुषारात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर चित्तथरारक ‘एअर शो’ सादर करण्यात आला. ज्यात तेजस, सुखोई लढाऊ विमानांनी सहभाग नोंदवून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ध्वनीच्या वेगाच्या १.६ पट म्हणजेच सुमारे २ हजार किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असलेले ‘तेजस’ ५० हजार फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता राखून असल्याचे सांगण्यात आले. ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. आपल्या नाशिक भेटीचा उल्लेख करताना सिंह यांनी, नाशिकची भूमी धार्मिक आणि ऐतिहासिक असल्याचे सांगत, इथे आल्यावर दिव्य भूमीत आल्यासारखे वाटत असल्याचे स्पष्ट केले. इथे आस्था, श्रद्धा असल्याचे सांगताना त्यांनी देशातील बारापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरचा 'शिवभूमी' असा उल्लेख केला.

आत्मनिर्भर भारताचे दमदार पाऊल

‘तेजस एमके-१ ए’ भारतीय हवाई दलात अधिकृतपणे दाखल होणे, हे आत्मनिर्भर भारताचे दमदार पाऊल असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी काढले. आपला देश आजवर इतर देशांवर अवलंबून होता. सद्य:स्थितीत आपण देशात ६५ टक्के विमानांचे पार्ट‌्स बनवत आहोत. थोड्याच दिवसांत आपण १०० टक्के आत्मनिर्भर होणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू